विना तारण कर्ज योजना (CGTMSE) बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेत असताना बँकेच्या नियमाप्रमाणे कर्जदाराला जामीनदार द्यावा लागतो. तसेच मुख्य मालमत्तेवर (prime assets) बँकेच्या कर्जाचा बोजा तर चढतोच पण कर्जदाराला दुसऱ्या मालमत्तेचेपण तारण (collateral security) द्यावे लागते. बऱ्याच वेळा कर्ज प्रकरणांत काहीही त्रुटी नसताना फक्त सक्षम (पुरेसा) जामीनदार / तारण देता येत नसल्यामुळे कर्जदारास कर्ज मिळत नाही. अशा वेळी केंद्र शासन पुरस्कृत सूक्ष्म एवं लघु उद्यम क्रेडिट गारंटी निधी ट्रस्ट (CGTMSE Trust) संचालित `विना तारण कर्ज योजना’ कर्जदाराच्या मदतीला धावून येऊ शकते.…